शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मोठी घोषणा

मुंबई | देशातील शेतकऱ्यांसाठी(Farmer)केंद्र सरकार(Central Goverment) अनेक योजना राबवत असते. काही योजनांमार्फत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत देत असते, अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान ‘किसान सन्मान योजना'(PM Kisan Sanman Nidhi Yojna).
किसान सन्मान योजनेद्वारे सरकार शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रूपयांची आर्थिक मदत देते. हे पैसे तीन टप्प्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे बारा हफ्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे.
परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी 13 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याचदा याबाबत सोशल मीडियावर काही अफवा पसरवल्या गेल्या होत्या. आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) याबाबत मोठी घोषणा केली आहे.
नुकतेच मोदी म्हणाले आहेत की, 26 जानेवारी पर्यंत या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. सध्या तारीख निश्चित झाली नाही. परंतु जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळू शकतात.
दरम्यान, सध्या या योजनेचा फायदा देशातील 12 कोटींहून अधिक लोक घेत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-