शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस

Read Time:3 Minute, 7 Second

मुंबई : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले आहे. मात्र, राजकीय उलथापालथ सुरूच आहे. आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. खंजीर खुपसणा-यांचे माझ्यावर इतके प्रेम का? असा प्रश्न नोटीस न पाठवल्याने आदित्य ठाकरे यांनी केला.

एकनाथ शिंदे गटातील ३९ आणि ठाकरे कॅम्पमधील १४ आमदारांना नोटिसा मिळाल्या आहेत. सोमवारी सुप्रीम कोर्टात दोन्ही गटांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अध्यक्ष निवडणूक आणि बहुमत चाचणीच्या वेळी व्हिपचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे. या ५३ आमदारांना आठवडाभरात उत्तर मागितले आहे. राज्य विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या या ५३ आमदारांना पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेच्या नियमाअंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. आमदारांना सात दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

सरकारच्या बाजूने मतदानास होता विरोध
४ जुलै रोजी एकनाथ शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी बहुमत चाचणीसाठी शिवसेनेच्या आमदारांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिप जारी केले होते. त्याचवेळी शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनीही शिवसेनेच्या सर्व आमदारांना सरकारच्या बाजूने मतदान न करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेच्या एकूण ४० आमदारांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर एक आमदार शिंदे गटात सहभागी झाला. तसेच १५ जणांनी विरोधात मतदान केले.

भरत गोगावलेंनी केली याचिका
त्याच दिवशी भरत गोगावले यांनी सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली होती. प्रस्तावाच्या बाजूने मतदान न करणा-या १४ आमदारांवर अपात्रतेसह शिस्तभंगाची कारवाई करावी. ठरावाच्या विरोधात मतदान न करणा-या शिवसेनेच्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी याचिकाही प्रभू यांनी दाखल केली होती. त्यांनी ३९ जणांची नावे दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − 1 =