शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस काढू शकतो : केसरकर

Read Time:1 Minute, 24 Second

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर अभिनंदनपर भाषणात चांगलीच टोलेबाजी रंगली. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्हीपचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शिवसेनेच्या १६ आमदारांना आम्हीही अपात्रतेची नोटीस काढू शकतो, पण आम्ही आज तसे बोलणार नाही असे सांगत व्हीपची चर्चा बाजूला ठेवूयात असे म्हणाले.

ते म्हणाले की, अध्यक्ष महोदय मी आपले निवडीसाठी अभिनंदन करतो, त्यामुळे आज राजकीय भाषणे होत नसते. या ठिकाणी भाषणे झाली त्याच्यामध्ये व्हीपचा उल्लेख झाला, तसा आम्हीही काढलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसवर दिला आहे. त्यामुळे आजचा दिवस चर्चा करायची नाही, अन्यथा आम्ही सुद्धा म्हणू शकलो असतो की आम्ही सुद्धा तुम्हाला व्हीप दिला आहे. आम्ही सुद्धा त्यांना अपात्रतेसाठी बोलू शकतो, पण आम्ही ते बोलणार नाही. आजचा प्रसंग तो बोलण्याचा नाही. प्रसंग आपला अभिनंदन करण्याचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × 4 =