“शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातील पिंजऱ्यातलं मांजर”

Read Time:1 Minute, 46 Second


मुंबई | सध्याची शिवसेना म्हणजे शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यामधील मांजर झालेली आहे, अशी बोचरी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.

शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि हे आम्हाला भाजपाची शाखा म्हणताहेत. आधी स्वत: काय आहात ते पाहा. शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या प्राणी संग्रहालयातल्या पिंजऱ्यातील मांजर झालेली आहे, असं संदीप देशपांडे म्हणालेत.

संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या औरंगाबादमधील नेतृत्वाचाही समाचार घेतला. शिवसेनेचे औरंगाबादमधील नेतृत्व हे आऊटडेटेड झालेलं आहे, अशी टीका केलीये.

मनसेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही आमचा पक्ष वाढवतोय. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवतेय त्याचं काय, त्याबाबत जयंत पाटील काय बोलणार आहेत, असं संदीप देशपांडे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

मुख्यमंत्री असताना मी रोज दोन तास…- शरद पवार

राजू श्रीवास्तव आपल्या मागे सोडून गेले ‘इतक्या’ कोटींची संपत्ती!

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 7 =