August 19, 2022

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नेरली कुष्ठधामयेथे अन्नदान.

Read Time:1 Minute, 45 Second

नांदेड दि. २३- दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज जिल्ह्यात उत्साहाने साजरी करण्यात आली. शहराच्या विविध भागात शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरांमध्ये अनेक ठिकाणी रक्तदान लसीकरण यासारख्या समाजोपयोगी कार्यक्रमासह शिवसेनेचे सिडको शहर प्रमुख गजानन राजुरवार यांनी नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान कार्यक्रम आयोजित केला. 

  शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, यांच्या अध्यक्षतेखाली व संपर्कप्रमुख प्रकाश मारावार अशोक उमरेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नेरली कुष्ठधाम येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाचे संयोजक गजानन राजुरवार यांचे अन्नदान उपक्रमाबद्दल कौतुक करत जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रकाश मारावार अशोक उमरेकर राहुल तारू यांनी समयोचित विचार व्यक्त केले . यावेळी कुष्ठधाम प्रकल्पाच्या संचालिका गायकवाड मॅडम यांनी राजुरवार व त्यांच्या सिडको शहरातील सहकाऱ्यांना धन्यवाद दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

20 − nine =

Close