शिक्षकाची नोकरी लावतो म्हणून 9 लाख 75 हजारांची फसवणूक


नांदेड(प्रतिनिधी)-बुध्दभूषण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि त्यांच्या नातलगांनी आपल्याच नातेसंबंधातील व्यक्तीची 9 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणाचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला आहे. बुध्दभूषण एज्युकेशन सोयाटीची बळीरामपुर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय कार्यरत आहे.
दि.27 मार्च 2024 रोजी संघरत्न पंडीतराव गायकवाड या सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षकांच्या पुत्राने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे शिक्षण डी.एड्‌., एलएलएम असे झाले आहे. त्यांचे मामा जळबा कांबळे आणि बुध्दभूषण एज्युकेशन सोयाटीचे अध्यक्ष नामदेव ढवळे हे वर्ग मित्र आहेत. मी सन 2007 मध्ये नोकरीच्या शोधात असतांना माझे कुटूंबिय यांनी नामदेव ढवळे यांना एका दिवशी चर्चेमध्ये सांगितले की, मुलगा नोकरीच्या शोधात आहे. तेंव्हा नामदेव ढवळे म्हणाले की, माझी शाळा, माझ्या शाळेवर प्राथमिक शिक्षकाची जागा रिकामी आहे. मला 10 लाख रुपये दिले तर मी ती जागा तुम्हा उपलब्ध करून देतो. त्यावर सुरूवातीला अडीच लाख दिले. मी 2014 पर्यंत त्या शाळेवर शिक्षकाचे काम करत होतो आणि इतर कामे पण करत होतो.2012, 2014, 2016 आणि 2020 अशा वेगवेगळ्या कालखंडात मी माझे कुटूंबिय, माझे मित्र, माझे नातलग अशा ओळखींच्या लोकांसमोर ढवळे कुटूंबियांना एकूण 9 लाख 75 हजार रुपये दिले. पण माझे नियुक्ती पत्र काही मला मिळाले नाही. तेंव्हा मी तगादा लावला. त्यावेळी मग नामदेव अर्जून ढवळे, त्यांच्या पत्नी संगिता नामदेव ढवळे, सुशिल नामदेव पाटोदेकर, प्रज्ञा संजय लाठकर, त्यांचे पती संजय लाठकर, शाळेतील शिक्षक गणेश भुजंगराव ढवळे, नंदकुमार रामजी शिंगटे या सर्वांनी मिळून माझी 9 लाख 75 हजारांना फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुध्द योग्य ती कार्यवाही व्हावी. नांदेड ग्रामीण पोलीसांनी संघरत्न गायकवाडचा हा अर्ज वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हा क्रमांक 250/2024 दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 420, 406 आणि 34 जोडण्यात आलेली आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे.
मुंबई राहणाऱ्या महिला नांदेडमध्ये लिपीक पदावर
या शाळेत प्रज्ञा लाठकर या लिपीक पदावर कार्यरत आहेत. परंतू त्या मुंबईला राहतात अशी माहिती संघरत्न गायकवाड यांनी दिली. मुंबईला राहुन नांदेडच्या शाळेतील लिपीक पदाचा कार्यभार नामदेव अर्जुन ढवळे यांच्या कन्या प्रज्ञा संजय लाठकर ह्या कशा चालवतात असा प्रश्न संघरत्न गायकवाड यांनी वास्तव न्युज लाईव्हशी बोलतांना उपस्थित केला.


Post Views: 474


Share this article:
Previous Post: ग्राम विकास अधिकाऱ्याची लुट – VastavNEWSLive.com

April 1, 2024 - In Uncategorized

Next Post: पुस्तकाचा गुत्तेदार आता पत्रकारांचा गुत्तेदार झाला

April 1, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.