August 19, 2022

शिक्षकांच्या पगारात २५ लाखाचा भ्रष्टाचार

Read Time:2 Minute, 56 Second

माळाकोळी : जि. परिषद केंद्रीय शाळा माळेगाव यात्राच्या मुख्याध्यापकाने केंद्रातील शिक्षकांच्या पगारामधुन कपात झालेली जवळपास २६ लाख रूपयांची रक्कम हडप करून भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.सदर मुख्याध्यापकास शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.हा भ्रष्टाचार पुढे आल्याने शिक्षकात खळबळ उडाली आहे.

लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा असून मुख्याध्यापक म्हणून नजीर ताबोंळी कार्यरत होता. या केद्रांतील शिक्षकांच्या पगारामधुन दरमहा एल. आय. सी. ची रक्कमसह इतर रक्कम कपात करण्यात येत होती.परंतू गेल्या अनेक दिवसापासून एल. आय. सी. ची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा न करता, सर्व पतपेढी ची रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा केली नाही. भाग्यलक्ष्मी बँकेचे कपात रक्कम , विद्यार्थी उपस्थिती भत्ता वाटप न करता तोही हडप केला. अशाप्रकारे २५ लाख ८४ हजार २०० रुपयाचा भ्रष्टाचार मुख्याध्यापक नजीर ताबोंळी यांनी केला. ताबोंळी हे एवढयावर न थांबता मुख्यमंत्री सहाय्यता निधीची शिक्षकांच्या पगारीमधुन कपात झालेली रक्कम, इनकमटँक्स रक्कम सुद्धा हडप केली.

केंद्र प्रमुख कै. वैजनाथ सिदुसरे त्यांच्या एल. आय. सी. चे पगारामधुन नियमित हप्ते कपात केली नाही.ती रक्कम एल. आय. सी. कार्यालयात वेळेत जमा न केल्यामुळे त्यांच्या वारसांना दावा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत असून एल. आय. सी. मिळते की नाही यावर मोठा प्रश्न आहे. प्रथम दर्शनी २५ लाख ८४ हजार २०० रूपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी मुख्याध्यापक नजीर ताबोंळी यांच्यावर निलंबनाची कारवाई लोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांनी केली आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे दैनिक एकमतशी बोलताना सांगितले. हा भ्रष्टाचार पुढे आल्याने शिक्षकात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

13 + 16 =

Close