August 19, 2022

शासकीय विश्रामगृहामागील विहिरीत मृतदेह आढळला

Read Time:2 Minute, 31 Second

नांदेड : शहरातील मुख्य रस्त्यावरील देवगिरी विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची घटना बुधवारी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे़ दरम्यान या मृत व्यक्तीची ओळख पटली असून कोंचिग क्लासचालक कैलाश राठोड यांचा तो भाऊ इंदल राठोड असल्याचे उघड झाले आहे़

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पावडेवाडी नाक्याकडे जाणा-या मुख्य रस्त्यावर शासकीय देवगिरी विश्रामगृह आहे़ या इमारतीला लागूनच एक जुनी विहिर आहे़ याच विहिरीतच बुधवारी दुपारी एकच्या सुमारास एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. ही माहिती पोलिस व महानगरपालिकेच्या पथकांना मिळाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी रईस पाशा व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

मोठी कसरत करत अग्निशामन दलाच्या जवानांनी रोपवेद्वारे सदर मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे पाठविला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रारंभी हा मृतदेह कोणाचा आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता़ मात्र चौकशीअंती या मृतदेहाची ओळख पटली असून कोंचिग क्लासचालक प्रा़ कैलाश राठोड यांचा तो भाऊ इंदल राठोड यांचा असल्याची माहिती पुढे आली आहे.

इंदल यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही़ सदर वृत्त लिहीपर्यत शिवाजी नगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू होती़ दरम्यान इंदल राठोड यांच्या पार्थिव देहावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − one =

Close