शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Read Time:1 Minute, 0 Second

झारखंड : देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. अनेक राज्यांनी शाळा आणि महाविद्यालये बंद केली आहेत. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार झारखंडमधील ३९ शाळकरी मुले कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. १३ जानेवारी २०२१ रोजी झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील किमान ७ शाळांमधील ३९ मुले कोविड पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जामा ब्लॉकमधील ४ हायस्कूलमधील ३४ विद्यार्थी आणि जरमुंडी, दुमका आणि शिकारीपाडा ब्लॉकमधील इतर ५ शाळांतील मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहेत. जामा ब्लॉकचे तीन शिक्षकांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + seventeen =