शाखा पिंजून काढा, विभागवार मेळावे घ्या

Read Time:2 Minute, 6 Second

मुख्यमंत्र्यांचे शिवसेना विभागप्रमुखांना आदेश

मुंबई : आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्यावर आजही कायम आहोत, जे गेलेत त्यांचा विचार करू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना म्हणाले. विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा, असे आदेशही उद्धव ठाकरेंनी विभागप्रमुखांना दिले आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज संध्याकाळी सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा आदेश दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी यासंबंधी आदेश दिले. त्यामुळे शिवसेनेने बंडखोरांची आशा सोडल्याचे दिसते. सर्व शाखांमध्ये नव्याने बांधणी करण्याच्या उद्देशाने सर्व विभागप्रमुखांना आज बोलावण्यात आले होते. या बैठकीत सर्व मुद्यांवर चर्चा करण्यात आली आणि शिवसेनेची नव्याने बांधणी करण्याच्या दृष्टीने आता सर्वांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्यावर आजही काम आहोत. जे गेले त्याचा विचार करू नका.आपल्याला आणखी ताकदीने लढायचे आहे. विभागावर मेळावे लावा, शाखा-शाखा पिंजून काढा. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावे लागेल, असे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published.

18 − 3 =