शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार

Read Time:7 Minute, 48 Second

मुक्रमाबाद : देशासाठी बलीदान दिलेले मुखेड तालुक्यातील बामणी येथे दापका रोडवरील चौकात शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर दि.२२ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.शहीद शिंदे यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी अनेकांच्या आश्रुचा बांध फुटला आणि शहिद सुधाकर शिंदे अमर रहे.. च्या घोषणांनी गाव दुमदुमून गेले.

रविवारी सकाळी ६.३० वाजता शहीद सुधाकर शिंदे यांचे पार्थिव मुक्रमाबाद येथे अंत्यदर्शनासाठी थांबवण्यात आले होते. त्यानंतर ८ वाजता त्यांचे पार्थिव बामणी या त्यांच्या मुळगावी नेण्यात आले. गावातील चौकात तासभर थांबवल्यानंतर त्यांचे पार्थिव घरी घेऊन जाण्यात आले. यावेळी नागरीकांच्या आश्रूंचे बांध फुटले होते. सकाळी १० वाजता शहीद सुधाकर शिंदे यांच्या अंत्ययात्रा निघुन ११ वाजता अंत्यसंस्काराच्या ठिकाणी ही अंत्ययात्रा पोहचली. आयटीबीपीचे सहाय्यक कमांडंट शहिद सुधाकर शिंदे यांना नांदेड पोलीस दलाच्या वतीन २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर ईंडो तिबेट बॉर्डर पोलीसदलाच्या ४५ व्या बटालीयनच्या वतीने शहिद शिंदे यांना तोफांची सलामी देण्यात आली.

शहीद सुधाकर शिंदे यांच्या पत्नी सुधा व वडील रमेश यांच्याकडे लष्कराच्यावतीने पार्थिवावरील तिरंगा यथोचित सन्मानाने सुर्पुद करण्यात आला. यानंतर शहिद सुधाकर शिंदे अमर रहे.. च्या घोषणांनी बामणी गाव दुमदुमुन गेले.शहिद सुधाकर शिंदे यांना त्यांचा मुलगा कबीर शिंदे व भाऊ गोविंद शिंदे मुखाग्णी दिला. यावेळी आश्रूनयनांनी निरोप देताना कुटुंबातील सदस्यांसमवेत बामणी गावातील प्रत्येक नागरीकांचे डोळे पानावले होते. बामणी गावातील कर्तबगार कमांडंट काळाने हिरावला असल्याने रविवारी अंत्यसंस्कार होईपर्यंत गावात चुल पेटलीच नाही.शहीद सुधाकर शिंदे यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुलगा कबीर, मुलगी काव्या, आई, वडील व भाऊ गोविद शिंदे, पाच बहीणी असा मोठा परीवार आहे.

सुधाकर शिंदे यांच्या अकाली विरमरणामुळे बामणी गावासह परीसरावर शोककळा पसरली आहे.शहीद सुधाकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जि.प.अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, मुखेडचे आमदार डॉ.तुषार राठोड,विधान परिषद सदस्य, आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार हानमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी आमदार सुभाष साबणे, जि.प.सदस्य प्रविण चिखलीकर, नांदेडच्या महापौर मोहीनी यवनर, नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, सभापती संजय बेळगे, जि.प.सदस्य प्रतिनिधी बबन पाटील गोजेगावकर, मुखेडचे नगरअध्यक्ष बाबुराव देबडवार, भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर, संतोष बोंडलेवर, अफ्रीकेतुन आलेले हरीभाऊ वाघमारे, दिल्लीहुन आलेले संजय राठोड, नांदेडचे जिल्हाअधिकारी डॉ.विपीन ईटनकर, नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, ऊपजिल्हाअधिकारी शक्ती कदम, वडदकर, तहसिलदार काशिनाथ पाटील, तहसिलदार व्यंकटेश मुंडे, तहसिलदार विजय चव्हाण पेशकार गुलाब शेख, बामणीचे सरपंच माधवराव पाटील, बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ, देगलुरचे पि.आय.भगवान धबडगे, मुखेडचे पि.आय. विलास गोबाडे, मुक्रमाबादचे स.पो.नि.कमलाकर गड्डीमे, पो.ऊपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे ,कमांडंट सुधाकर शिंदे यांच्या बॅचचे परभणी येथील बॅचमेंट, मंडळ अधीकारी मुंढे तसेच महसुल व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील व गावाकडे सुट्टीवर आलेले जवान यांच्यासह परिसरातील अनेक गावातील आठ ते दहा हजार नागरीक शहीद सुधाकर शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते.

शिंदे परिवाराच्या दु:खात सहभागी : पालकमंत्री
नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सहाय्यक समादेशक शहीद सुधाकर राजेंद्र शिंदे यांच्या बलिदानाने सर्वांवर शोककळा पसरली आहे. त्यांचे वीरमरण हे देशासाठी आहे. अत्यंत मेहनतीने आणि स्वकष्टाने त्यांनी विविध आव्हानांवर मात करुन सहाय्यक समादेशक पदापर्यंत प्रगती साध्य केली. देशाच्या वैभवाचे प्रतिक असणा-या लाल किल्ल्यापासून अनेक ठिकाणी त्यांनी सुरक्षितेची जबाबदारी चोखपणे बजावली. छत्तीसगडमधील नारायणपूर येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात महाराष्ट्र शासन सहभागी असल्याचे सांगून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

खा. चिखलीकर यांच्याकडून श्रद्धांजली
जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बामणी येथील जवान सुधाकर शिंदे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. आयटीबीपीच्या असिस्टंट कमांडन्ट ( सहायक समादेशक अधिकारी) पदापर्यंत त्याची यशस्वी वाटचाल. गावसह जिल्ह्यासाठी भूषणावह होती. नक्षलवादी हल्लयात या भूमिपुत्र वीरमरण आले.हे वृत्त अत्यंत दु:खद आहे .शिंदे कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहोत.अशा शब्दात खा. प्रतापराव पाटील चिखलीकर शोक व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

four + sixteen =