July 1, 2022

शरीरात लपवून आणले तब्बल ९०० ग्रॅम सोने

Read Time:1 Minute, 49 Second

इम्फाल : येथील विमानतळावर तैनात सीआयएसएफच्या जवानांसमोर एक अजब प्रकार घडला आहे. दिल्लीला जाणा-या एका प्रवाशाच्या शरीराच्या पोकळीत एक असामान्य गोष्ट आढळून आली आहे. पुढे या प्रवाशाची शारीरिक तपासणी केल्यानंतर त्याच्या गुप्तांगात चक्क ९०० ग्रॅमहून अधिक सोन्याची पेस्ट सापडली आहे. सोमवारी (२७ सप्टेंबर) दुपारी १ च्या सुमारास ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रवासी मूळचा केरळचा रहिवासी आहे. त्याच्या शरीरातील पोकळीत धातू आढळल्याचे उपनिरीक्षक बी डिल्ली यांनी सांगितले.

संबंधित प्रवासी इम्फालहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणार होता. मात्र, सीआयएसएफ जवानांच्या प्रश्नांना हा प्रवासी समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर, त्याला वैद्यकीय तपासणी कक्षात नेण्यात आले. जिथे त्याच्या खालच्या शरीराचा एक्स-रे काढण्यात आला ज्यात त्याच्या शरीराच्या पोकळीत काही प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले. पुढे अखेर या प्रवाशाने कबूल केले की, तो सोने (सोन्याची पेस्ट) घेऊन जात होता. त्याच्या शरीरातील पोकळीत धातू आढळल्याचे उपनिरीक्षक बी डिल्ली यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

8 − 2 =

Close