“शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा तुम्हाला…”

Read Time:1 Minute, 20 Second


मुंबई | सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा तुम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का?, असा सवाल एकनाथ शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असं सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात, असा सवालच थेट रामदास कदमांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉ़गबाजी थांबवावी, असंही रामदास कदम म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)जेही मिळालं ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळालं, आदित्य ठाकरेंना जे पक्षात, सत्तेत जे स्थान मिळालं ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळालं असल्याचं सांगत पक्ष संघटना कुणी वाढवली, असा सवाल कदम यांनी केला आहे.
Online NEWS source

Leave a Reply

Your email address will not be published.

twelve + 18 =