January 19, 2022

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तब्बल १५ वर्षे केला अत्याचार! धुळ्यातील मन सुन्न करणारी घटना

Read Time:2 Minute, 11 Second

राज्यात महिला अत्याचाराच्या मन हेलावून टाकणार्‍या घटना समोर येत आहे. डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सलग ८ महिने अत्याचार केल्याची घटना ताजी असतांनाच धुळ्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये आरोपीने सलग १५ वर्षे अत्याचार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे.

पिडीतीने फीर्यादीत दिलेल्या नावाप्रमाणे नाना भदाणे याने पिडीतेला धुळ्यातील अवधान येथे एका शाळेचे बांधकाम सुरु असणार्‍या जागेवर नेले आणि शांततेचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. ही घटना २००६ ची आहे. अत्याचार करतांनाचा व्हिडिओसुद्धा त्याने तयार केला.

त्यानंतर भदाने याने पिडीतेस व्हिडिओ व्हयरल करण्याच्या धमक्या दिल्या आणि ब्लॅकमेल करत लग्नानंतर सासरी गेल्यावरसुद्धा तिच्यावरव अत्याचार केला. यामध्ये भदानेसोबत त्याचा साथीदारसुद्धा सहभागी आहे. त्यानेसुद्धा पिडीतेला ब्लॅकमेल करत वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन पिडीतेवर अत्याचार केले.

व्हिडिओ व्हयरल झाल्याने बदनामी होईल या भितीने पिडीतेने तब्बल पंधरा वर्ष अत्याचार सहन केले. मात्र अखेर ती यामुळे मेटाकुटीस आल्यामुळे तिने धैर्य दाखवत पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना सर्व प्रकार सांगीतला. घटनाक्रम ऐकताच पोलिससुद्धा हैराण झालेत. मात्र गुन्हा दाखल करुन घेत पोलिसांनी लगेचच तपासास सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven − ten =

Close