व्हायरल झालेल्या व्हिडीओतील युवकाला तीन दिवस पोलीस कोठडी


नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल व्हिडीओ व्हायरलनंतर युवकाविरुध्द भारतीय न्याय संहिता आणि बाल अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश एम.आर.पांडे यांनी अल्पवयीन बालिकेसोबत अश्लिल वर्तन करणाऱ्या या युवकाला तीन दिवस अर्थात 6 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले.
काल दुपारच्यावेळेस एक व्हिडीओ व्हायरल झाल. त्यामध्ये एका शाळेच्या वाहनात एक युवक आणि एक अल्पवयीन बालिका आक्षेपार्ह अवस्थेत बसलेले त्या व्हिडीओत दिसत होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या ऍटोचा शोध झाला. तो ऍटो एम.एच.26 एन.9001 या क्रमांकाने नोंदणीकृत आहे. या संदर्भाने पोलीस अंमलदार बजरंग दिगंबर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अल्पवयीन बालिकेसोबत अश्लिल वर्तन करणारा मोहम्मद अय्याज मोहम्मद फय्याज (23) असा आहे. त्याने व्हिडीओमध्ये आपले नाव वेगळेच सांगितले होते. प्रत्यक्षात त्याचे नाव वेगळेच आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 96 आणि पोक्सो कायद्यातील कलम 8 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक पी.एन.कुकडे यांच्याकडे देण्यात आला. अटक केलेल्या मोहम्मद अय्याज मोहम्मद फय्याजला आज न्यायालयात हजर केल्यानंतर सरकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुल्ला(डांगे) यांनी या प्रकरणात पोलीस कोठडी देण्याची का गरज आहे याचे सविस्तर विवेचन केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश एम.आर.पांडे यांनी शेख अय्याजला तीन दिवस अर्थात 6 जुलै 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.


Post Views: 810






Share this article:
Previous Post: टी.सी. देण्यासाठी कुलरच्या रुपात लाचेची मागणी ; संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल

July 3, 2024 - In Uncategorized

Next Post: रुग्णाने मृत्यूअगोदरच अवयवदानाची इच्छा व्यक्त केली; सहा जणांना मिळाले जीवनदान

July 3, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.