January 19, 2022

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला

Read Time:3 Minute, 11 Second

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एलपीजीच्या महागाईचा बॉम्ब फुटला असून, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.

घरगुती सिलिंडरचे सध्याचे दर
एक ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कोलकात्यात ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर ९१५.५० रुपयांना उपलब्ध आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलिंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. दिल्लीत आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ९२६ रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे.

कुठे किती दर?
या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर २००० रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १७८३ रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलिंडर आता १९५० रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलिंंडर २०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २१३३ रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − ten =

Close