‘वेलडन’ नांदेडकर…; सनदी अधिका-यांचा रविवार ठरला लयभारी

Read Time:3 Minute, 32 Second

नांदेड : राजयात कोरोनानिमित्त सर्वत्र गणरायाच्या विसर्जनासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यानुषंगाने पुणे वगळता राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. त्याच प्रमाणे नांदेड जिल्हा संवेदनशिल असतांनाही यावेळी मात्र नांदेडकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे गणरायाचे विसर्जन अगदी शांततेत व आनंदाच्या उत्साहात पारपडले. याचे श्रेय नांदेडकराइतकेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या टिमला जाते. त्यांनी देखील नांदेडकरांनी दिलेल्या प्रतिसादाला वेलडन नांदेडकर म्हणत आभार मानले.

गेल्या दहा दिवसापासून जिल्ह्यात व शहरात विविध ठिकाणी गणरायची स्थापना करण्यात आली होती. तत्पुर्वी शांतता समितीची बैठक घेवून पोलिस अधीक्षकासह जिल्हा प्रशासनाने सर्वानाच गणरायाचे दहा दिवस शांततेने व कोरोनाचे नियम पाळून साजरा करावा असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनास नांदेडकरांनी प्रतिसाद दिल्यामुळे रविवारी सकाळपासूनच गणरायाच्या विसर्जनास सुरुवात झाली असली तरी कुठेही ढोल ताशे, डिजेचा आवाज पहावयास मिळाला नाही. मिरवणुकीवर बंदी असल्यामुळे प्रत्येकानी नियमांचे पालन करत गणरायाचे विसर्जन केले. गणरायाच्या विसर्जनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे व महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने या तिघांनी आपसातील नियोजन उत्तम पध्दतीने केले.

महापालिकेने गणरायचेश संकलन केंद्र निर्माण करुन नागरिकांना विसर्जन करण्यासाठी सोपा मार्ग केला. काही ठिकाणी तलाव निर्माण करण्यात आले होते. नदीकाठी जीवरक्षक दलाची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे स्वत: प्रत्यक्षदर्शनी कामकाज पाहत होते. अनेक ठिकाणी त्यांनी गणपतीचे विसर्जन स्वत: केले. त्यामुळे नागरिकात उत्सह दिसून आला. पोलिस अधीक्षक शेवाळे रात्री उशिरापर्यंत बंदोबस्तात व्यस्त होते. महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी आपल्या टिममार्फत गणरायाच्या विसर्जनाबाबत चोख व्यवस्था केली. एकंदरीत संवेदनशिल असलेल्या जिल्ह्यात कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. सर्वत्र आनंदात उत्साह साजरा करण्यात आला. त्यामुळे सनदी अधिका-यांनी वेलडन नांदेडकर म्हणत नांदेडकरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

4 × five =