वेदांता-फाॅक्सकाॅन ग्रुपचा प्रकल्प नेमका काय होता?, जाणून घ्या सविस्तर

Read Time:3 Minute, 31 Second

मुंबई | एखादी गोष्ट आपल्याला मिळता मिळता राहणं म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय सध्या सगळ्यांना आला आहे. महाराष्ट्रात येता येता राहिलेला वेदांता-फाॅक्सकाॅन (Vedanta-FaxScan) ग्रुपचा प्रकल्प गुजरातला गेला. यामुळे शिंदे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

सेमीकंडक्टर व डीस्पले फॅब्रीकेशनचा हा प्रकल्प पुण्यातील तळेगाव येेथे होणार होता. हा प्रकल्प एकूण 1 लाख 54 हजार कोटींचा होता. या प्रकल्पातून जवळजवळ एक ते दिड लाख लोकांना रोजगार (Employment) मिळणार होता.

महाविकास आघाडीच्या काळात वेदांता-फाॅक्सकाॅन कंपनीला महाविकास आघाडीने 39 हजार कोटींची कर सवलत दिली होती. तर गुजरातने या प्रकल्पाला 29 हजार कोटींची सवलत दिली. तरीही हा प्रकल्प गुजरातला (Gujarat) गेला आहे.

महाराष्ट्रात होणाऱ्या या प्रकल्पासाठी तळेगावजवळील 1100 एकर जमीनही देण्यात आली होती. 30 ते 35 हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने ऑफर करण्यात आल्या होत्या. पुण्यातील (Pune) जमीन आणि वातावरण योग्य होते. गुजरात मध्ये या प्रकल्पासाठीचे अनुकूल असे वातावरण अजिबात नाही आहे. तसे असूनही या प्रकल्पला महाराष्ट्रात स्थान मिळालं नाही.

दोन महिन्यापूर्वी शिंदे सरकार अस्तित्वात आलं. तसेच विधानसभेच्या भाषणात देखील मुख्यमंत्र्यानी या प्रकल्पासंबधी बैठक झाली असून प्रकल्प महाराष्ट्रालाच मिळणार असं आश्वासन दिलं होतं. आता मात्र मुख्यमंत्रीचा तो व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान हा प्रकल्प गुजरातला जाण्याचं कारण म्हणजे गुजरात हे सेमीकंडक्शन राज्य आहे. सेमी कंडक्शन धोरण बनवणारं गुजरात हे एकमेव राज्य आहे. गुंतवणूक व्हावी यासाठी सरकारनं स्टेट इलेक्ट्रॅानिक मिशन (State Electronic Mission) स्थापन केलंं. गुजरात सरकार आधीच गुंतवणूकीसाठी तयार होतं.

गुजरात सरकारच्या या पाॅलिसीमुळे सेमीकंडक्टर बनवणाऱ्या कंपन्यानी गुजरातशी संपर्क साधला. गुजरातच्या मुख्यमंत्र्याशी बैठक झाल्यानंतर मंगळवारी औपचारिक पद्धतीने सह्या (Sign) झाल्या, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, याबाबत वेदांताच्या प्रकल्पापेक्षा मोठा किंवा त्याच्या तोडीस तोड प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात येईल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) दिल्याचं देखील उदय सामंतांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 1 =