वेदांता प्रकल्पावरून शिंदे सरकार अॅक्शन मोडमध्ये, शिंदे-फडणवीसांसह राणे घेणार पंतप्रधानांची भेट

Read Time:2 Minute, 36 Second


मुंबई । महाराष्ट्रात उभारण्यात येणार असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा तब्बल दिड लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटला आहे. वेदांता हा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्यात आला. या सर्व प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापल्याचं पहायला मिळतंय.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातुन गेल्यामुळे विविध स्तरातील नेतेमंडळींकडून शिंदे सरकारवर हल्लाबोल होत आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना प्रत्युत्तर देत हा प्रकल्प तत्कालिन मविआ सरकारमुळे महाराष्ट्राबाहेर गेला असा आरोप केला आहे.

आता मात्र फॉक्सकॉनवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील त्रिमुर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मोदींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहेत. हा प्रकल्प आपल्याच राज्यात रहावा यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे आग्रही असल्याचं दिसून येतंय.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान मोदींशी मंगळवारी रात्री फोनवर चर्चा केल्याची देखील माहिती समोर आलेली. फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षाही मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्यात येईल. ज्या प्रकल्पातुन महाराष्ट्रातील बेरोजगारी दुर होण्यास मदत होईल. असं आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“गद्दारी करणारे परत निवडून येणार नाहीत”

Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणाला नवं वळण, प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published.

nine − 6 =