August 19, 2022

वेतन थकल्याने नगर परिषदेचे कंत्राटी कामगार आक्रमक

Read Time:3 Minute, 4 Second

कंधार : स्वच्छ भारत अभियानाचा डंका एकीकडे वाजविला जात असताना गेली अनेक वर्षे भल्या पहाटे हातात खराटा घेऊन शहर लख्ख करणारा सफाई कामगार मात्र दुर्लक्षितच राहिला आहे. स्वच्छता कामगारांना तीन ते चार महिन्यापासून पगार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी स्वच्छतेची कामे बंद करुन नगरपरिषद समोर स्वच्छता कामगारांनी दि.१४ रोजी साखळी उपोषण सुरू केले आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने आर्थिक संकटात सापडलेले कंधार नगर परिषदेचे कंत्राटी सफाई कामगार पगारा अभावी सावकाराच्या दारी तर अस्वछतेमुळे कंधारकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे तर निगरगट्टट प्रशासनाने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे नाईलाजास्तव स्वच्छता कर्मच-यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असल्याचे सांगितले. नगर परिषदेचे सफाई कर्मचारी शहरात साथरोग होऊ नये यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र स्वच्छेतेचे काम करत आहे. विशेष म्हणजे कोविड केअर सेंटर, कंटेनमेंट झोन भागात ही कर्मचारी स्वच्छतेचे काम केले आहे.

कोरोना काळात सुट्टी नाही. आरोग्य यंत्रणेप्रमाणेही स्वच्छता कर्मचार्‍यांवर मोठा ताण यांच्यावर होता. त्यातच कंधार नगर परिषदेच्या कारभारामुळे पगार नसल्याने कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. निदान अत्यावश्यक सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना तरी प्रशासनाने वेठीस धरू नये असा सुर कर्मचार्‍यांमध्ये ऐकायला मिळत आहेत.

यावेळी भाई केशवराव धोंडगे माजी खासदार व आमदार, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अंगद केंद्रे, शेकापचे अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई, शिवसेनेचे बाळू पाटील क-हाळे, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, संयुक्त ग्रुपचे साईनाथ मळगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन साखळी उपोषणाला पाठिंबा देत नगर परिषद प्रशासनाने यांच्या मागण्या त्वरित मान्य करावे अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

two + two =

Close