January 25, 2022

वेटलिफ्टिंग या क्रिडा प्रकारात भारताच्या “मीराबाई चानू” यांनी रौप्यपदक जिंकले.

Read Time:1 Minute, 11 Second

भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये आता नवा इतिहास रचला आहे. त्यांनी ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातले ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरेच पदक आहे. यापूर्वी सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताने वेटलिफ्टिंगमध्ये एक पदक जिंकले होते. तेव्हा कर्णम मल्लेश्वरी या खेळाडूने हे पदक भारताला मिळवून दिले होते. ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणारी मीराबाई चानू ही पहिलीच वेटलिफ्टर आहे.

पहिल्या प्रयत्नात मीराबाईने ८४ किलो वजन उचलले तर दुसर्‍या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले. मात्र मीराबाई तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलण्यात अपयशी ठरल्या. त्याचबरोबर स्नॅच फेरीत तिने दुसरे स्थान पटकावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =

Close