वृध्द माणसाची 80 हजारांची बॅग गायब करण्यासाठी त्यांच्या कपड्यावर रंग टाकला


नांदेड,(प्रतिनिधी)-एक व्यक्ती बॅंकेतून 80 हजार रुपये काढून जात असतांना त्याच्या कपड्यांवर रंग टाकून ती 80 हजार रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याप्रकरणी भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुंडलिक गंगाराम पसलवाड(70) यांनी 1 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजेच्यासुमारास बॅंकेतून 80 हजार रुपये काढले आणि ते थैलीमध्ये ठेवून ते बाजार करण्यासाठी पायी जात असतांना शिवाजी चौक भोकर येथे आले असतांना त्यांच्या शर्टवर व धोतरावर रंग टाकल्याचे दिसल्यानंतर त्यांनी साईराम मेडीकलच्या कॉन्टरवर आपल्या हातीतील थैली ठेवली आणि पाणी आणून कपडे साफ करत असतांना त्यांची नजर चुकवून ती 80 हजाराची थैली लंपास केली आहे. ही घटना भारतीय न्याय दंड संहितेच्या कलम 318(4) आणि 3 (5) नुसार गुन्हा क्रमांक 196/2024 नुसार दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कल्पना राठोड अधिक तपास करीत आहेत.


Post Views: 49






Share this article:
Previous Post: पोलीस अधिक्षक कार्यालयात वसंतराव नाईक यांना अभिवादन

July 1, 2024 - In Uncategorized

Next Post: वंचित बहुजन आघाडीचे सहा नवीन पक्ष प्रवक्ते जाहीर

July 2, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.