विष्णुपूरी प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले

नांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे १०० टक्के टक्के भरले आहे. पाण्याचा येवा वाढल्याने प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विश्रांती घेतलेल्या पावसाचे गेल्या तीन दिवसापासून पुर्नगमन झाले आहे.रविवारी तर शहरासह जिल्हयात दिवसभर मुसळधार पाऊस झाला.या पावसामुळे नदी,नाले ओसंडून वाहत आहेत तर शहराला पाणी पुरवठा करणारा गोदावरील नदीवरील विष्णुपुरी प्रकल्प तुडूंब भरला आहे.

पाणी साठा १०० टक्के झाल्याने रविवारी रात्री गेट न.६ व १३ नंबरचा दरवाजा उघडण्यात आला.यानंतर आज सोमवारी आणखी एक १४ नंबरचा दरवाजा उघडण्यात आला.या तीन्ही दरवाजामधून खालच्या भागात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेत.दुपारीपर्यंत १३७४ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु होता.

पुराचा धोका लक्षात घेता नदी काठच्या व आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.दरम्यान काही दिवसापुर्वी नांदेड जिल्हयात झालेला पाऊस,दिग्रस बंधा-याचे पाणी आणि प्रकल्पाच्या वरच्या झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × one =

vip porn full hard cum old indain sex hot