January 25, 2022

विष्णुपूरी तुडूंब: प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला

Read Time:4 Minute, 56 Second

नांदेड : आशिया खंडातील सर्वात मोठा असलेला विष्णुपूरी उपसा जलसिंचन प्रकल्प मृग नक्षत्राच्या पहिल्याच पावसात तुडूंब भरला आहे. प्रकल्पाच्या वरच्या भागातून पाण्याची आवक अजून सुरूच असल्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा रविवारी मध्यरात्री १ वाजता उघडण्यात आला आहे. यामुळे खालच्या भागातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नांदेड जिल्हयात मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागात मृग नक्षत्राच्या अगोदरपासून पाऊस पडत असल्याने विष्णुपुरी प्रकल्पात मोठया प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहेग़ेल्या आठवड्याभरापासून पाण्याची आवक सुरूच आहे.यामुळे विष्णुपूरी प्रकल्प १०० टक्के भरला होता. यामुळे विष्णुपुरी प्रकल्पातून रविवार दि. १३ जून रोजी मध्यरात्री रात्री एक वाजता सात नंबरचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.यातून ४७१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.तर लेवल ३५४ झाले होते. पूर्णा परिसरात रात्रीला पाऊस पडल्याने विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या उघडण्यात आलेल्या या एक दरवाज्यामधून सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ४१० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला जात असल्याची माहिती विष्णुपुरी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे यांनी दिली आहे.

धरणाच्या वरच्या भागात पाऊस उघडल्यास विष्णुपुरी प्रकल्पाचे दुपारपर्यंत गेट बंद करण्यात येईल नांदेड शहराला पाणीपुरवठा करणारा व शेतीला पाणी जीवनदान देणारा विष्णुपुरी प्रकल्प चार वषार्नंतर प्रथमच जून महिन्यात शंभर टक्के भरल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे.
विष्णुपूरी प्रकल्पाच्या खालील बाजूस असणा-या सर्व गावातील नागरिकांना आपल्या मालमत्तेची पशुधनाची हानी होणार नाही.तसेच नदीपात्र परिसरात असलेल्या वीटभट्टी साहित्य व इतर कोणतीही हानी होणार नाही यासाठी नांदेड, मुदखेड, उमरी, नायगाव व लोहा तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

धरण उशाला अन् कोरड घशाला नांदेडकरांच्या पाण्याचा प्रश्न तुर्त सुटला आहे.परंतू सध्या विष्णुपूरी प्रकल्प शंभर टक्के भरत असतांना महापालिकेकडून नांदेड शहराला मात्र नागरिकांना कोणतीही माहिती न देता तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहेक़ाही भागात तर तीन ते चार दिवसाआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत.यामुळे भर पावसात धरण उशाला अन् कोरड घशाला म्हणण्याची वेळ नांदेडकरांवर आली आहे.

२४ तासात सरासरी ३३.६० मि. मी. पाऊस
जिल्ह्यात सोमवार दि.१४ जुन रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी ३३.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात एकुण १३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवार १४ जून रोजी २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे: नांदेड- १६.३० , बिलोली- ३६.५० , मुखेड- २६.४० , कंधार- २३.४० , लोहा- २४.२० , हदगाव-४२.४० , भोकर- २० , देगलूर- २१.६० , किनवट- ६०.५० , मुदखेड- २४.४० , हिमायतनगर- ३९.८०, माहूर- ६१.६०, धमार्बाद-६३.९० , उमरी- ४३.९०, अधार्पूर- ८.१० , नायगाव- ३७.८० मिलीमीटर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 − eight =

Close