विष्णुपुरी प्रकल्पाच्या तीन दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरूच

Read Time:2 Minute, 52 Second

नांदेड : जिल्ह्यात मागच्या तीन दिवसापासुन पावसाचा कमी- अधिक प्रमाणात जोर सुरूच असुन, या पावसाने विष्णुपुरी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला आहे.यामुळे प्रकल्पाचे गुरूवारी ६ दरवाजे उघडण्यात आले होते.सध्या पावसाने उघडीप दिल्याने शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत तीन दरवाजे बंद करण्यात आले असून अजूनही प्रकल्पाच्या चार दरवाज्यातुन १०५३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

जिल्हयात बुधवारी दिवसभर संततधार पाऊस झाला. तोच दुस-या दिवशी गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास धुवाधार पावसाने हजेरी लावली.जवळपास एक तास झालेल्या या पावसाने रस्त्ये जलमय झाले तर रस्त्यावरील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. यंदा जूनमध्ये दमदार सुरवात केलेल्या पावसाने मध्यंतरी थोडा खंड पाडला आणि जुलैच्या पहील्या आठवड्यापासुनच पावसाने चांगला जोर पकडला.मागच्या आठवड्यात दि.११ जुलै रोजी नांदेड जिल्हयास मुसळधार पावसाने झोडपुन काढले होते.

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर दोन ते तीन दिवसापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. तर यापुर्वीच राज्यात पाच दिवसाच्या दमदार यपावसाचा अंदाच हवामान खात्याने वर्तवला होता. आणि त्यानुसार जिल्ह्यासह राज्यात दमदार पाऊस कोसळला. तर आणखी दोन राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असुन २६ जुलै पर्यंत गंभीरस्थिती असनार असे हवामान खात्याने म्हटले आहे. जिल्हयात सुरू असलेल्या धुवांधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.पाण्याची आवक वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचे गुरूवारी ६ दरवाजे उघडण्यात आले होते.सध्या पावसाने उघडीप दिल्याने शुक्रवारी सायंकाळी सहापर्यंत दरवाजे बंद करण्यात आले असून अजूनही प्रकल्पाच्या चार दरवाज्यातुन १०५३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − 14 =