विष्णुपुरी धरणाचे आठ दरवाजे उघडले

Read Time:3 Minute, 2 Second

नांदेड : गेल्या दोन दिवसापासून धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे.यामुळे सोमवारी दुपारपर्यंत पुन्हा एकदा विष्णुपुरी धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या दरवाज्यामधून २६९६ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू करण्यात आला आहे.धरणात पाण्याची आवक अजन सुरूच असल्यामुळे नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

यंदा पावसाने सुरूवातीपासून जोरदार एंट्री केली आहे.मागील दोन महिन्यात जिल्हयातील विविध भागात मुसळधार पाऊस झाला होता.यामुळे काही भागात तर अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.यात शेतक-यांची हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली.यानंतर पावसाने काही दिवस विश्रांती घेतल.यानंतर गेल्या चार,पाच दिवसात पाऊस सक्रिय झाला आहे.

नांदेड जिल्हयात आणि विष्णुपूरी धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे.या पाण्याचा येवा वाढल्याने विष्णुपूरी धरणाचे रविवार चार तर सोमवारी दुपारीपर्यंत चार असे आठ दरवाजे उघडण्यात आले आहेत.या आठ दरवाज्यातून २६९६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.सध्या पाणी पातळी ३५३ :१५ असून साठा ५३:८८ एवढा झाला आहे.धरण क्षेत्रात पाण्याचा येवा अजून सुरूच असल्याने नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणाचे आठ दरवाजे उघडल्यामुळे गोदावरीनदी दुथडी भरुन वाहत असून दासगणू पुलाच्या काठोकाठ भरुन वाहत आहे.

१८ नंबरचे गेट बंदच;चर्चेला उधान
कोट्यावधी रुपये खर्च करुन आमदार, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे प्रमुख अधिका-यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. परंतु आजघडीला १८ नंबरचे गेट बंदच असल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. यामागील इंगित काय आहे हे कळायला मार्ग नाही. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष ध्यावे, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

eight + 10 =