
विधान परिषदेच्या ६ जागांचा निवडणूककार्यक्रम घोषित
मुंबई : निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.
ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा. तसेच, भाजपाची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.
असा आहे निवडणूक कार्यक्रम :
अधिसूचना जाहीर झ्र १६ नोव्हेंबर, अर्ज दाखल करण्याची तारीख झ्र २३ नोव्हेंबर, अर्जाची छाननी झ्र २४ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख झ्र २६ नोव्हेंबर, मतदान झ्र १० डिसेंबर, मतमोजणी १४ डिसेंबर
More Stories
आता शिंदे गटाकडूनच व्हीप
शिवसेनेच्या १६ आमदारांना गोव्यात हजर राहण्यास सांगितले मुंबई : पक्षात फूट पाडल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेना आमदारांविरोधात नवा डाव...
सिटी चिटस् च्या वतीने रंगणार उद्या डॉक्टरांचा सन्मान सोहळा
हॉटेल मिडलँड, स्टेडीअम रोड, येथे शनिवार , सायंकाळी ६.०० ,वा, २ जुलै , २०२२ रोजी आयोजन...! नांदेड – बातमीदार नांदेडातील...
अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी येथे संपन्न
इंदापूर : दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्यात वारक-यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज...
देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात समावेश घेणार नाहीत
मुंबई : शिवसेने एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार...
रिक्षाचालक, नगरसेवक ते मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे यांचा प्रवास
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल...
फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडेंना जागा मिळणार का?
मुंबई : राज्यात आठवडाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये अखेर उद्धव ठाकरे सरकार पायउतार झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री राजीनामा...