विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पटोले-फडणवीस भेट

Read Time:1 Minute, 34 Second

मुंबई : विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. भेटीत नाना पटोले फडणवीसांसोबत विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी चर्चा करण्याचीही शक्यता आहे. महाराष्ट्रात ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि भाजपामध्ये गोंधळ पाहायला मिळत असला तरी आता विधान परिषदेची निवडणूक होऊ घातलीय. त्यामुळे काँग्रेसने बिनविरोध निवडणुकींसाठी पुढाकार घेतलाय. यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.
विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ डिसेंबरला मतमोजणी आहे. या ६ जागांमध्ये मुंबई, कोल्हापूर, धुळे, अकोला, नागपूर या जागांचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

16 + five =