August 19, 2022

विद्यार्थीनीला फेसबुकने दिले १.६ कोटींचे पॅकेज

Read Time:2 Minute, 27 Second

नवी दिल्ली : मुली कोणत्याच बाबतीत आता मुलांपेक्षा कमी राहिलेल्या नाहीत. मुलांच्या खांद्याला खांदा लावून मुलीही सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे आपण पाहात आलो आहोत. याचच एक उदाहरण पटनाच्या एनआयटीच्या अदिती तिवारीने दाखवून दिले आहे. फेसबुककडून चक्क १ कोटी ६० लाखांचे पॅकेज घेऊन तिने नवा विक्रम केला आहे. अदितीने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. ती इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आता फेसबुकमध्ये ती फ्रंट एंड इंजिनिअर म्हणून काम करणार आहे.

अदितीला एवढे मोठे पॅकेज मिळाल्याने पाटणा एनआयटीचा विक्रम मोडीत निघाला आहे. ही कामगिरी केल्यानंतर कॉलेजचा गेल्या पाच वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. एनआयटी पाटणामधील विद्यार्थ्याला मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज आहे. याआधी, या कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक पॅकेजेस ५० ते ६० लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळालेले आहेत. अदितीने दिलेल्या माहितीनुसार तिला फेसबुककडून जानेवारी महिन्यातच ऑफर लेटर मिळाले होते. मात्र त्यांनी नुकतीच कॉलेजला याबाबत माहिती दिली आहे. अदिती ही जमशेदपूरची रहिवासी आहे.
अदितीचे वडील संजय तिवारी हे टाटा स्टीलमध्ये काम करतात. आई मधु सरकारी शाळेत शिक्षिका आहे. पाटणा एनआयटीच्या ट्विटर पेजवरूनही अदितीचे या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. अदितीने फेसबुकच्या करिअर पेजला भेट देऊन अर्ज केला होता. त्यानंतर तिला ही संधी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

sixteen − twelve =

Close