August 19, 2022

विठ्ठल-रुक्मिणीला एक कोटींचे मुकुट

Read Time:1 Minute, 57 Second

उमरी (जिल्हा नांदेड): येथील सराफा व्यापारी व माजी नगराध्यक्ष विजयकुमार उत्तरवार यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी दोन किलो वजनाचा एक कोटी रुपये मूल्य असलेला सुवर्ण मुकुट अर्पण करीत आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी हा सुवर्ण मुकुट विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी अर्पण करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वीच त्यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीसाठी सुवर्ण मुकुट अर्पण करण्याचा हा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी १६८ ग्रॅम वजनाच्या ४४ कॅरेट सोन्यापासून बनविलेले दोन सुवर्ण मुकुट तयार करून घेतले. या दोन सुवर्ण मुकुटांचे बाजार मूल्य एक कोटी रुपये एवढी आहे.

खामगाव जिल्हा बुलढाणा येथील खास सुवर्ण कारागीरांकडून हे सुवर्णमुकुट त्यांनी बनवून घेतले.
पंढरपूर येथे रविवारी आषाढी एकादशीच्या दिवशी विधिवत कार्यक्रमात दोन्ही मुकुट अर्पण करण्यात येणार आहेत, अशी माहिती विजयकुमार उत्तरवार यांचे चिरंजीव डॉ. अनंत उत्तरवार यांनी दिली. सुवर्ण मुकुट अर्पण कार्यक्रमासाठी विजयकुमार हे पत्नी जयश्री, मुले ओंकार, अरविंद, अच्युत यांच्यासह पंढरपूर येथे पोहोचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

13 + twelve =

Close