January 25, 2022

विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले होणार

Read Time:3 Minute, 14 Second

पंढरपूर : महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणा-या श्री विठूरायाचे मंदिर वाढत्या प्रादुर्भावामुळे दुस-यांदा बंद करण्यात आले होते. यामुळे विठ्ठल भक्तांची निराशा झाली होती. मात्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे विठ्ठल भक्ताचा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील सर्व मंदिरे ७ ऑक्टोबर पासून उघडणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात साफसफाई तसेच भाविकांच्या दर्शनासाठीची सुविधा करण्याचे काम मंदिर समितीने हाती घेतले आहे.

याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडणार असून यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमाचे पालन करून भाविकांच्या दर्शनाची सोई सुविधांबाबतची चर्चा करण्यात येणार असून दर्शनासाठी सोडण्यात येणा-या भाविकांची संख्या ठरवली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दुस-यांदा बंद ठेवण्यात आली होती. सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकारने ७ ऑक्टोबर रोजी पासून सर्व धार्मिक स्थळे मंदिरे उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शना बाबतची व्यवस्था तसेच साफसफाईचे काम सुरू करण्यात आले असून विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार असून याबाबत मंदिर समितीची बैठक काही दिवसातच होणार आहे.

यामध्ये शासनाने कोरोना बाबतचे घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून भाविकांना कशा पद्धतीने दर्शन देता येईल याबाबत चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेले मंदिर उघडणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 12 =

Close