विठुरायाचे दर्शन आता लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही घेता येणार

Read Time:2 Minute, 18 Second

पंढरपूर / प्रतिनिधी
धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे दहा वर्षाखालील मुलं, जेष्ठ नागरिक व गरोदर महिलांसाठी खुली करणेबाबत महाराष्ट्र शासन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश काढला आहे.

यामुळे कार्तिकी यात्रेदरम्यान विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन आता वयस्कर व गरोदर मातांना देखील घेता येणार आहे.
कोरोनाचा प्रादूर्भावामुळे १० वर्षातील व ६५ ज्येष्ठ नागरिकांना व गरोदर मातांना मंदिरात प्रवेश नव्हता. परंतु ज्या ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले आहे. लसीकरणाच्या दुस-या मात्रेनंतर १४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशा ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक व गरोदर स्त्रियांनासुध्दा धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांना भेट देण्याची मुभा देण्यात येत आहे.

धार्मिक स्थाने,प्रार्थना स्थळांच्या क्षेत्रात प्रवेश करताना मास्क, शारिरीक अंतर राखणे, औष्णिक पटेक्षण ) व हात धुणेकिंवा रोगाणुरोधक यंत्र (थर्मलस्कॅंिनग) अनिवार्य असेल. या शिवाय कोविडच्या फैलावास प्रतिबंध करण्यासाठीच्या उपाय योजन, अटी व शर्ती लागू राहतील. याशिवाय, कोविड च्या प्रतिबंधासाठी वर निर्दिष्ट केलेल्या आदेशात विहित केलेले शारिरीक अंतर राखणे व खबरदारी याबाबतच्या सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक राहील. असा आदेश महाराष्ट्र शासन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 5 =