विजेवर चालणारी सायकल; अर्धापूरच्या तरूणांने लावला वैज्ञानिक शोध..!

अर्धापूर : देशभरात वाढलेले पेट्रोल व डिझेलचे दर लक्षात घेऊन एक वैज्ञानिक शोध लावला असून पेट्रोल – डिझेलला योग्य पर्याय देत अधार्पूर शहरातील पानटपरी चालवण-या एका तरूण युवकांने केवळ चौदा हजार रुपये खर्च करून विजेवर चालणारी सायकल तयार केली आहे.

वाहनातील पेट्रोल व डिझेल या इंधनामूळे मोठे प्रदूषण होत आहे. हे प्रदुषण टाळण्यासाठी तसेच पेट्रोल आणि डिझेलची महागाई झाल्याने विजेवर चालणारी कार व मोटरसायकल आपण पाहीली आहे. मात्र आता तर अधार्पुरात पानटपरी चालवणा-या ३२ वर्षीय शिवहार घोडेकर या तरुणांनी वैज्ञानिक शोध लावून विजेवर चालणारी सायकल तयार केली आहे. ही सायकल इंधन महागाईच्या काळात इंधन बचत व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

देशभरातील वाहनांना आखाती देशातून पेट्रोल, डिझेल सह इंधन आणावे लागते. या इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या असून यामध्ये अजूनही दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून विदेशातील चार्जिंगवर चालणारी कार व मोटारसायकल भारतात तयार करण्याची परवानगी मिळाल्याने चार्जिंगवर चालणारी कार पार्डी म. येथील प्रगतीशील शेतकरी विठ्ठलराव देशमुख यांनी प्रथम अधार्पूर तालुक्यात आणली. मात्र अधार्पूरच्या शिवहार घोडेकर यांनी चक्क विजेवर चार्जिंग करून चालणारी सायकल स्वत: तयार केली आहे.

अधार्पुर शहरात कंत्राटी काम करीत असलेल्या मात्र कोरोना दरम्यान लाँकडाऊन लागल्याने पानटपरी टाकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणा-ाा ३२ वर्षीय शिवहार घोडेकर यांनी केवळ १४ हजार रुपये खर्च करुन विजेवर चार्जिंग करून चालणारी सायकल बनविली असून ही सायकल अधार्पुर शहरात धावत आहे. पेट्रोलच्या खर्चात बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही सायकल महत्वाची ठरली आहे. या सायकलचा वैज्ञानिक शोध लावणा-या शिवहार घोडेकर यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − six =

vip porn full hard cum old indain sex hot