विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस – VastavNEWSLive.com


नांदेड,(प्रतिनिधी)-शहरात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन अस्तव्यस्त दिसत आहे.

सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास अचानक आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि वादळी वारे जोरात वाहू लागले. त्यामुळे सर्वत्र धुळीचे वातावरण तयार झाले. त्यानंतर काही वेळातच छोट्या छोट्या पावसांच्या थेंबानी सुरुवात झाली. पण पावसाचा जोर वाढतच गेला आहे. वृत्त लिहीपर्यंत पावसाचा जोर वाढत वाढत चालला आहे. शहरभरात जनजीवन असल्यास झाले आहे. आज रविवारचा आठवडी बाजार शहरात भरतो. पण त्या बाजारात सुद्धा सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. दिसणाऱ्या परिस्थितीनुसार पाऊस लवकर थांबेल याची काही चिन्हे दिसत नाहीत.

 


Post Views: 83


Share this article:
Previous Post: भाजीपाला मार्केटमध्ये पत्नीला पेटवले – VastavNEWSLive.com

May 12, 2024 - In Uncategorized

Next Post: दोन तासाच्या पावसाने महानगरपालिकेच्या सफाई कामाची लक्तरे वेशीवर

May 12, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.