August 19, 2022

विजय माल्याला ४ महिन्यांच्या तुरुंगवासासह २ हजारांचा दंड

Read Time:1 Minute, 27 Second

नवी दिल्ली : फरारी मद्यसम्राट विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला २ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाने माल्याला चार आठवड्यांच्या आत आठ टक्के व्याजासह ४ कोटी डॉलर (सुमारे ३१,७६,४२,००० रुपये) जमा करण्याचे निर्देश दिले आहेत असे न केल्यास त्याची संपत्ती जप्त केली जाईल.

9 हजार कोटी रुपयांच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणातील आरोपी विजय माल्याविरुद्ध अवमान खटल्यातील शिक्षेबाबत युक्तिवाद झाल्यानंतर ३० मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती यूयू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणातील न्यायालयीन सल्लागार जयदीप गुप्ता यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

twenty − one =

Close