वाहनाची आरसी, परवाना सोबत बाळगण्याची गरज नाही

Read Time:3 Minute, 18 Second

नवी दिल्ली : वाहन चालवताना तुम्ही सोबत वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) किंवा वाहन नोंदणी पुस्तिका (आरसी, रजिस्ट्रेशन कार्ड) न ठेवल्याबद्दल तुमचे चलान कापले गेले असेल. कारण ही कागदपत्रे ड्रायव्हरकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र आता ही सर्व कागदपत्रे सोबत ठेवण्याची गरज नाही आणि यामुळे तुमचे चलानही कापता येणार नसल्याची तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा-१९८९ मधील दुरुस्तीच्या आधारे जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड) सोबत बाळगणे आवश्यक नाही. त्याऐवजी, तुम्ही ही कागदपत्रे एमपरिवहन मोबाइल अ‍ॅपमध्ये साठवू शकता. गरज पडल्यास ही कागदपत्रे एमपरिवहन मोबाइल अ‍ॅपद्वारे अधिका-यांना दाखवता येतील. हे १०० टक्के वापरकर्त्यांसाठी स्वीकार्य, प्रमाणित आणि सोयीस्कर आहे.

अशाप्रकारे करा वापर
स्क्रीनच्या टॉपवर तुमचा व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स पाहण्यासाठी डॅशबोर्ड बटणावर क्लिक करा, एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर, तुमचा डीएल तपशील आणि एक क्यूआर कोड दिसेल. हा कोड कागदपत्रांची सर्व आवश्यक माहिती स्कॅन करण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी अधिकारी वापरतात. तुम्ही अ‍ॅपमध्ये तुमच्या वाहनांचे आरसी बुक तपशील देखील जोडू शकता.

अनेक वाहने जोडू शकता
एमपरिवहन अ‍ॅपवर, व्यक्ती किंवा व्यक्तीद्वारे वापरलेली अनेक वाहने जोडता येतात. उदाहरणार्थ, पत्नीने नोंदणी केलेले वाहन चालवणारा पती त्याच्या अ‍ॅपवर वाहन तपशील देखील जोडू शकतो. त्याचप्रमाणे, ड्रायव्हिंग लायसन्सचे तपशील अनेक मोबाइल डिव्हाइसवर जोडले जाऊ शकतात.

तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स कसे जोडाल?
१ सर्वात आधी एमपरिवहन अ‍ॅप डाउनलोड करा.
२ : तुमचा मोबाईल नंबर वापरून साइन अप करा. तुम्हाला एक ओटीपी मिळेल. अ‍ॅपवर एंटर करा आणि रजिस्टर करा.
३ : आता, तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत- डीएल(ड्रायव्हिंग लायसन्स) आणि आरसी(रजिस्ट्रेशन सर्टिफिकिट).
४ : तुमचा डीएल नंबर एंटर करा.
५ : व्हर्च्युअल डीएलसाठी अ‍ॅड टू माय डॅशबोर्डवर क्लिक करा.
६ : जन्मतारीख एंटर करा आणि तुमचा डीएल तुमच्या डॅशबोर्डवर जोडला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

10 + 6 =