वाळू माफियांची नवी शक्कल; मोबाईल अ‍ॅपद्वारे इंजिन लॉक

Read Time:2 Minute, 56 Second

नांदेड : गोदाकाठी असलेल्या गंगाबेट रेतीघाटाजवळ रविवारी दोन हायवा ट्रक बेकायदेशीर रेती वाहतुक करताना पकडण्यात आले़ मात्र कारवाई टाळण्यासाठी सदर हायवा ट्रकच्या मालकाने मोबाईल अ‍ॅपद्वारे एका हायवा ट्रकचे इंजिन लॉक केल्याने सदर वाहन जप्त करून ठाण्यात नेण्यासाठी पोलिस व महसुलच्या अधिका-यांना जवळपास सहा तास कसरत करावी लागली़ या कारवाईत पोलिसांनी अवैध रेतीसह जवळपास २७ लाखाचा मुद्देमाल जप्त केली.

गोदाकाठी असलेल्या या गंगाबेट घाटावरून वाळू तस्करी होत असल्याची खबर पोलिस व महसूल विभागाला मिळाली़ यावरून रविवार दि़ ३ जूलै रोजी दुपारी घाटावर जावून तपासणी केली असता, या ठिकाणी पाच वाहने अवैध रेती वाहतूक करताना आढळून आले. यातील तीन वाहने पळून गेली तर दोन हायवा ट्रक पकडण्यात पोलिस व महसूलच्या पथकाला यश आले़ मात्र यावेळी एका हायवाच्या मालकाने मोबाईल अ‍ॅपद्वारे सदर हायवा ट्रकचे इंजिन लॉक केले. रस्त्यात हायवा बंद पडल्याने शहरातून एका मेकॅनिक बोलावून इंजिन चालू करण्यासाठी पोलिसांचा सहा तास कसरत करावी लागली़. यानंतर रविवारी रात्री ११ वाजता दोन्ही वाहने ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत ठाण्यात लावली आहेत.

सदर कारवाई पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, पोउपनि बिचेवार यांच्यासह तहसिलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलिस पथकाने संयूक्तरीत्या केली. रेती माफियांच्या या अनोखी शक्कलमुळे पोलिसांसह महसूल विभाग मेटाकुटीला आला आहे. या प्रकरणात मंडळाधिकारी कोंडीबा नागरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात हायवा मालक, चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि बिचेवार हे करीत आहेत़ या कारवाईत पोलिसांनी अवैध रेतीसह जवळपास २७ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत दोन वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे़.

Leave a Reply

Your email address will not be published.

nineteen − 2 =