May 19, 2022

वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही

Read Time:2 Minute, 21 Second

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिस पाळत ठेवत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी डीजीपींकडे तक्रार केली आहे. परंतु वानखेडेंवर मुंबई पोलिस पाळत ठेवून नसल्याचे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे. समीर वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या नसल्याचेही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आपल्यावर दोन पोलिस कर्मचारी पाळत ठेवून असल्याची तक्रार एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी केली आहे. राज्यात वाढणा-या गुन्हेगारीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राज्यातील पोलिस अधिका-यांची, कमिश्नर, अधीक्षकांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले आहे. समीर वानखेडेंनी डीजीपींकडे पोलिस पाळत ठेवून असल्याची तक्रार केली आहे. परंतु गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाळत ठेवण्यात आली नसून तशा सूचनाही मुंबई पोलिसांना दिल्या नसल्याचे सांगितले आहे.

सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आले
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीमध्ये सीबीआय प्रमुख सुबोध जैस्वाल यांना मुंबईच्या सायबर सेलकडून समन्स बजावण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

3 × five =

Close