वऱ्हाडी टेम्पो उलटून वधूच्या बहिणीसह 27 जन जखमी – VastavNEWSLive.com


आदमपूर (प्रतिनिधी)-नांदेड देगलूर महामार्गावर बिलोली तालुक्यातील किनाळा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ मुदखेड तालुक्यातील वैजापूर पार्डी येथून देगलूर तालुक्यातील शहापूर येथे लग्नासाठी जाणारा वऱ्हाडी टेम्पो उलटून झालेल्या अपघातात वधूच्या बहिणीसह 27 जन गंभीर जखमी झाल्याची घटना 5 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की मुदखेड तालुक्यातील वैजापूर पार्डी येथील मारोती विठ्ठलराव मंगलआपरे यांच्या मुलीचा शहापूर तालुका देगलूर येथील सोपानराव मारोती कमलेकर यांच्या मुलासमवेत दिनांक 5 मे रोजी सकाळी बारा वाजता शहापूर येथे विवाह आयोजित करण्यात आला होता.विवाह सोहळ्यासाठी वैजापूर पार्डी येथून वधू कडील वऱ्हाडी मंडळी एम एच 26 ए डी 6572 या टेम्पोमध्ये भांडीकुंडी सह वऱ्हाडी घेऊन जात असतांना हा टेम्पो नरसी देगलूर महामार्गावर किनाळा जवळ आला असता रोडच्या मधोमध पलटी झाला. या अपघातात कोणाचीही जीवित हानी झाली नसून वधूच्या बहिणीसह 27 गंभीर जखमी झाले.
किनाळा येथील विलास पांचाळ, नागेश मोहिते, होसाजी उगे, माधव वाघमारे, सह गावकऱ्यांच्या मदतीने सर्व जखमींना उपचारासाठी नायगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता.
तेथील रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवून दिले.अपघाताची माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे बिट जमादार डी के जांभळीकर व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Post Views: 6


Share this article:
Previous Post: पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या पथकाने वाळू चोरी करणाऱ्या कर्नाटकच्या तीन हायवा गाड्या पकडल्या 

May 5, 2024 - In Uncategorized

Next Post: नांदेड रेल्वे पोलीसांनी गुन्हा “बर्क’ करण्यासाठी लढवली नवीन शक्कल;16 वर्षीय बालिका आठ दिवसापासून गायब आहे, गुन्हा दाखल होत नाही

May 5, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.