January 21, 2022

वर्षा निवास्थानी पुन्हा कोरोनाचा शिरकाव

Read Time:58 Second

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुधीर नाईक यांची केविड १९ संसर्ग चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबई सेंट्रल येथील वॉक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांची तात्काळ कोविड १९ संसर्ग तपासणी करण्यात येत आहे. ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांचीही अधिक काळजी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवास्थानाचे सॅनिटायझेशन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve − 8 =

Close