January 21, 2022

वर्षभरानंतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा

Read Time:2 Minute, 5 Second

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान सेवा अखेर वर्षभरानंतर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दोन दिवसांपूर्वीच नागरी हवाई वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा लवकरच पूर्ववत होण्याचे संकेत दिले होते. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवेसंदर्भात केंद्र सरकारने २२ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा बंद केली होती. या स्थगितीची मुदत ३० नोव्हेंपर्यंत वाढवण्यात आली होती.

यानुसार ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षांखालील मुलांनी घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात राज्य सरकारांनी निर्देश जारी करावेत, अशी सूचनाही भारत सरकारने केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी क्षेत्राने आपल्या कर्मचा-यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी, असेही सरकारने म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × four =

Close