वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर विराट-रोहितवर…, कपिल देवची स्पष्ट भूमिका

Advertisements
Advertisements
Read Time:2 Minute, 24 Second


मुंबई | गतवर्षी झालेल्या वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत इंग्लडनं भारतावर दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट टीमचे कर्णधार माजी कपिल देव(Kapil Dev) यांनी रोहीत शर्मा(Rohit Sharma) आणि विराट कोहलीबद्दल(Virat Kohali) मोठं वक्तव्य केलं आहे.

Advertisements

कपिल देव म्हणाले आहेत की, वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर ट्रेनर, संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते यांना कठीण निर्णय घ्यावा लागणार आहे. वैयक्तिक स्वार्थ मागं सारून आपल्या संघाचा विचार करावा लागतो.

विश्वचषक जिंकण्यासाठी तुमचा रोहित शर्मा किंवा आणखी दोन-तीन खेळाडूंवर विश्वास असेल तर असं कधीही होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या टीमवर विश्वास ठेवण्याची गरज आहे, असंही कपिल देव म्हणाले आहेत.

काही खेळाडू असंही असतात की ते टीमचा आधार बनतात. परंतु आपल्याला किमान 5-6 खेळाडू तयार करावे लागतील. म्हणूनच माझे म्हणने आहे की, तुम्ही केवळ रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर अवलंबूर राहू शकत नाही, असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे.

तसेच पुढच्या काळात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबतही कपिल देव बोलले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आता एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे, आपल्यापेक्षा परिस्थीती कोणालच माहित नाही, असं कपिल देव एकदिवसीय विश्वचषकाबाबत बोलताना म्हणाले.

विराट-रोहितचा हा शेवटचा विश्वचषक आहे का, असं अनेकजण विचारत असतात. माझा विश्वास आहे की ते खेळू शकतात, परंतु यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतील. तसेच फिटनेसही महत्वाची आहे, असंही कपिल देव म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close

भाजपला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेच्या पुढच्या निवडणुकीला आता केवळ 400 दिवस उरलेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक (Loksabha Election) होणार आहे. यासाठी सत्ताधारी भाजपने (Bjp) तयारी सुरू केली आहे. भाजप 2024 मध्येही यश मिळेल आणि मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवला आहे. मात्र भाजपसाठी ही निवडणूक इतकी सोप्पी नसेल असं आता दिसतंय. भाजपला टक्कर...

ब्रेकअपनंतर मुलींमध्ये हा मोठा बदल होतो?

[ad_1] नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी राहतो. प्रेमाचा शेवट होतो तो ब्रेकअपनी(break up). अनेकदा यातून लोक बाहेर पडतात. खूप लोकं यातून लवकर बाहेर पडतात. काहीनां मात्र हे लवकर जमत नाही. त्या आठवणी, त्या व्यक्तीची आठवण नेहमीच त्रास देते. मुली-मुलं दोघांसाठीदेखील ब्रेकअप पचवणं अवघड असतं. याचा परिणाम...

चर्चा फक्त नरेंद्र मोदींच्या जॅकेटचीच; ‘हे’ आहे कारण

[ad_1] नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नेहमीच चर्चेत असतात. सध्या लोकसभेचं (Lok Sabha) अधिवेशन सुरु आहे. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी घातलेल्या जॅकेटनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. या जॅकेटनं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे मोदीचं हे जॅकेट अगदी वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे. मोदी नेहमीच त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असतात. मोदींनी घातलेलं हे जॅकेट साध्या कापडाचं...

‘या’ कारणांमुळं करीनानं तब्बल 3 वेळा नाकारलं होतं सैफचं प्रपोज

[ad_1] मुंबई | बाॅलिवूडची(Bollywood) ‘बेबो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करीना कपूरची(Kareena Kapoor) मोठी क्रेझ आहे. तर बाॅलिवूडचा ‘नवाब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सैफ अली खानचाही(Saif Ali Khan) मोठा चाहतावर्ग आहे. सैफ-करीनानं 2012 मध्ये लग्नगाठ बांधली आणि सध्या त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे. परंतु लग्नापूर्वी करीनानं तब्बल ३ वेळा सैफचं प्रपोज नाकारलं होतं. तर झालं असं होतं की, त्याकाळात करीना आणि शाहरूखचं ब्रेकअप...

मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…

[ad_1] नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) अनेक आरोप केले. यालाच मोदींनी प्रत्युत्तर दिलं. मोदी यांनी या भाषणावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं नाव न घेता खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, सभागृहात भ्रष्टाचार विरोधात तपास करणाऱ्या तपास यंत्रणांबद्दल बरंच काही...