वर्दीवर रिल्स बनवणाऱ्या महिला पोलिसावर मोठी कारवाई

Read Time:3 Minute, 16 Second


नवी दिल्ली | हल्ली रिल्स (Reel) बनवणं एक क्रेझ बनली आहे. कोरोनाच्या काळापासून सोशल (Socail media) मीडियाचा वापर वाढला आहे. या काळात अनेकजण टाईमपास म्हणून रील बनवायचे.

हे रिल सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर बनवले जातात. यापूर्वी हे रिल्स टिकटॉक नामक शार्ट व्हिडिओ फॉर्मटचे एका अॅपवर बनवले जायचे. यावर भारत सरकारने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदी घातली.

त्यानंतर इन्सटाग्रामने रीलचे ऑप्शन आणले. बघता बघता याची प्रसिद्धी(publicity) वाढली. पहिला काही मोजकेच लोक यावर व्हिडिओ बनवत असतं. त्यानंतर अभिनेता-अभिनेत्र्यांनीही यात उडी घेतली. अनेक रिल्स स्टारना(Reel Star) यामुळे प्रसिद्धी मिळाली आहे.

सध्या पहायला गेलं तर प्रत्येकजण फेमस होण्यासाठी या रिल्स बनवण्याचा पर्याय शोधत आहे. जो तो रिल्स बनवत आहे. काहीजण लिप्सिंग(lipsing) करुन रिल्स बनवतात तर काहीजण माहिती देणारे रिल्स बनवत आहेत.

रिल्सवर लाईक (Like) मिळवण्यासाठी आणि फेमस होण्यासाठी सगळ्या गोष्टी हद्दपार करत आहेत. अगदी जीवसुद्धा पणाला लावला जातो.

अनेकजण रेसिपीजचा तर काही स्पेशल ट्रिक देण्याचा व्हिडीओ करतात. अगदी हल्ली लहान पाच वर्षाच्या मुलांपासून ते अगदी आजी- आजोबांपर्यंत सगळ्यांना हा रिलचे वेड (Reel Madness) लागले आहे. आता पोलीसांनीसुद्धा रिल्स करण्यास सुरवात केली आहे.

असाच एक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशाच्या मुराबाद येथे एका पोलिस काँन्सटेबलने गणवेशात रील्स बनवल्यामुळे तीला निलंबित (Suspended) करण्यात आलं आहे.

मुरादाबादच्या अँटी रोमिओ स्क्वाॅडमधील महिला काॅन्स्टेबल मोहिनीने गणवेशात फिल्मी गाण्यावर डान्स केला. तो इन्स्टाग्रामवर टाकला. तो व्हिडिओ व्हायरल झाला.

या व्हिडीओमध्ये एका गाण्यांवर लिप्सिग करताना दिसत आहे. एसएसपी हेमंत कुतियाल यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले, त्यानंतर तिला निलंबित करण्यात आलं आहे.

या महिला काॅन्सटेबलचा व्हिडिओ कोणीतरी ट्विटरवरुन (tweet) टाकला आहे. त्या व्हिडीओत पोलिसांना टॅग केलं आहे. त्यामुळे याला उत्तर देताना पोलिसांनी सांगितलं की महिला काॅन्सटेबलला निलंबित करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published.

19 + 5 =