वर्तमानपत्रांमध्ये लेख छापण्यापूर्वी तपासणे बंधनकारक

Read Time:2 Minute, 16 Second

नवी दिल्ली : नीती आयोगाने आता आपल्या अधिका-यांच्या लिखाणावर सेन्सॉरशीप लागू केली आहे. त्यानुसार वर्तमानपत्रांच्या संपादकीय पानावर छापून येणारे लेख आधी आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून किंवा संबंधित वरिष्ठांकडून तपासून घेणे गरजेचे आहे.

याबाबत १२ मे रोजी सरकारने नीती आयोगाच्या अधिका-यांना एक पत्रही लिहिले आहे. यामध्ये सरकारच्या टॉपचे धोरणकर्त्यांनी म्हटले की, वर्तमानपत्रांच्या संपादकीय भागात किंवा मासिकांमध्ये किंवा न्यूज पोर्टल्सवर नावासहित छापून येणारे लेख हे त्यांची ओळख उघड करणारे असतात. पण अशा प्रकारच्या बा प्रकाशनांमध्ये छापून येणारे लेख संबंधित सल्लागारांमार्फत दोनदा तपासणे गरजेचे आहे. तसेच वरिष्ठ सल्लागार आणि अधिका-यांचे लेख सीईओकडून तपासले जाणे गरजेचे आहे.

सरकारच्या पत्रात म्हटले की, सर्व ओपी-ईडीएस/लेख नीती आयोगाच्या केवळ कम्युनिकेशन्स व्हर्टिकलद्वारे प्रकाशनासाठी पाठवले जावेत. ओपी-ईडी/ लेख बा प्रकाशनासाठी किमान गुणवत्ता मानके पूर्ण करतो की नाही, यावर कम्युनिकेशन्स व्हर्टिकल अंतिम निर्णय घेईल.

सर्वांना आदेश पालन करणे बंधनकारक
लेखी संवादाव्यतिरिक्त, नीती आयोगाच्या अधिका-यांनादेखील तोंडी आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. नीती आयोगाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हे आदेश दिल्याचे सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत नीतीचे उपाध्यक्ष सुमन बेरी, सीईओ परमेश्वरन अय्यर आणि इतर सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

eighteen − 17 =