वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाख रुपये आर्थिक मदत देणार

Read Time:3 Minute, 36 Second

मुंबई : वन्­यप्राण्­यांच्­या हल्­ल्­यात मृत पावलेल्­या व्­यक्­तीच्­या कुटूंबियांना आता २० लाख रुपयांचे आर्थिक मदत देण्यात येणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत आज विधानसभेत ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय २३ ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. याआधी वन्­यप्राण्­यांच्­या हल्­ल्­यात मृत पावलेल्­या व्­यक्­तीच्­या कुटूंबियांना १५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जात होती. जी आता वाढून २० लाख रुपये करण्यात आली आहे.

हा निर्णय जाहीर करताना वनविभाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, राज्­याच्­या वनविभागाच्­या माध्यमातून उत्तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. यामुळे वन्­यप्राण्­यांच्­या संख्­येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानवझ्रवन्­यजीव संघर्ष कमी करण्­याच्­या दृष्­टीने वनालगतच्­या गावांमध्­ये राहणा-या नागरिकांना वनविभागामार्फत प्रबोधन करण्­यात येत असून डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेमार्फत स्­थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्­याचा प्रयत्­न करण्­यात येत आहे.

पत्रकात पुढे सांगण्यात आले आहे की, वन्­यप्राण्­यांच्­या हल्­ल्­यामध्­ये सन २०१९ -२०, २०२०-२१ व २०२१ -२२ या तिन वर्षात अनुक्रमे ४७, ८०, ८६ इतकी मनुष्­यहानी झाली आहे. मनुष्­यहानी झालेल्­या व्­यक्­तींच्­या अवलंबित कुटूंबियांना वाघ, बिबट्या, रानडुक्­कर, गवा, अस्­वल, लांडगा, कोल्­हा, हत्­ती व रानडुकरे यांच्­या हल्­ल्­यात होणा-या मनुष्यहानीमुळे देण्­यात येणा-या आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्­यात आली असून यापुढे १५ लाच रुपये ऐवजी २० लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्­यात येणार आहे.

२० लाखपैकी १० लाख रुपये देय असलेल्­या व्­यक्­तीला तात्­काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्­कम रूपये १०लाख त्­यांच्­या राष्­ट्रीयकृत बँकेत असलेल्­या दरमहा व्­याज देणा-या संयुक्­त खात्­यामध्­ये ठेव रक्­कम अर्थात फिक्­स डिपॉझीट जमा करण्­याचा निर्णय घेण्­यात आला आहे. व्­यक्­ती कायम अपंग झाल्­यास ५ लाख रुपये आणि व्­यक्­ती गंभीररित्­या जखमी झाल्­यास १ लाख ते २५ हजार इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, वन्­यप्राण्­यांच्­या हल्­ल्­यात होणारी मनुष्­यहानी व त्­यामुळे संबंधित कुटूंबियांची होणारी आर्थिक परवड लक्षात घेता त्­या पाश्र्­वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला हा निर्णय महत्­वपूर्ण मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

fourteen − two =