वक्फ बोडार्ची जमीन खाजगी लोकांच्या नावे, उपजिल्हाधिका-यांसह ८ जणांविरुद्ध गुन्हा

Read Time:2 Minute, 29 Second

बीड : सारंगपुरा जवळील २५ एकर वक्फ बोर्डाची जमीन बनावट कागदपत्र बनवून खाजगी लोकांच्या नावावर केल्याप्रकरणी बीडमध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन. आर. शेळके यांच्यासह मंडळ अधिकारी पी. के. राख आणि ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जिल्हा वक्फ अधिकारी बीड अमीनजुमम्मा सय्यद यांच्या तक्रारीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड येथील सारंगपुरा मशिदीची सर्वे नंबर १२८ मधील २५ एकर ३८ गुंठे वक्फ जमीन महसूल कर्मचारी अधिकारी व भूमाफियांच्या संगनमताने खाजगी लोकांच्या नावावर करण्यात आली. सारंगपुरा मशिदीची नोंद महाराष्ट्र शासन राजपत्रात आहे. असे असताना वक्फ बोर्डाची मालकी काढून ही जमीन इनामदार रोशन आली पिता मूनव्वर आली यांनी २९/०६/१९८७ २७२५/९९ अन्वये दिनकर ज्ञानोबा गिराम यांना ९९ वर्षांच्या लिजवर दिली होती.

यामध्ये बेकायदेशीर फेरफार रद्द करून वक्फ बोर्डाचा मालकी लावून ताबा घेण्यासाठी अनेकदा अर्ज करण्यात आले. तरीदेखील वक्फ बोर्डास ताबा मिळालेला नसून उलट सदर जमीन बेकायदेशीरपणे खालसा करण्यात आलेली आहे. सदर सरंगपुरा मस्जिद जमिनीवर वक्फ बोर्डाची मालकी ईनाम जमिनीवर लावण्याऐवजी महसूल अधिकारी कर्मचारी यांनी संगनमत करून अशोक पिंगळे, श्रीमंत बापू मस्के, सर्जेराव पांडुरंग हाडूळ, उद्धव तुळशीराम धपाटे व सदर जमीन बेकायदेशीरपणे खालसा करणारे त्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे आदेश देणारे तत्कालीन उपजिल्हा अधिकारी एन आर शेळके यांच्यासह मंडळ अधिकारी पी. के. राख यांच्यासह आठ जणांविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्ह नोंदवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

two × 2 =