वंचित बहुजन आघाडी 9 विधानसभा लढविणार-बनसोडे


नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने नांदेड उत्तर जिल्ह्याची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी कार्यकर्त्यांनी करावी. आपल्याला नांदेड जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 9 विधानसभा लढवायच्या असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा पक्ष निरिक्षक ऍड.सर्वजित बनसोडे यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेला भदंत पय्याबोधी, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर, प्रा. राजू सोनसळे, ऍड.यशोनिल मोगले, डॉ.संघरत्न कुऱ्हे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी बनसोडे हे बोलतांना म्हणाले की, राज्यातील सर्वच विधानसभा निवडणुकी वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीनिशी लढविणार आहे. वंचितचे उमेदवार विजयी झाले किंवा पराजित झाले याच्यावर मुल्यमापन होत नाही. हे एक आंदोलन आहे. जय पराजयावरून मुल्यमापन ठरत नसते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलाचा प्रचार करून मते मिळवली. पण संविधान बचावचा नारा हा वंचितचा आहे. यासाठी मुंबई येथे संविधान परिषद आयोजित केली होती. महाविकास आघाडीत वंचितच्या वाट्याला लोकसभेसाठी केवळ 2 जागा दिल्या जात होत्या. त्या जागांवर आम्ही कधी विजयी होवू शकत नव्हतो. आम्ही मागितल्या होत्या. सांगली, हिंगोली, अकोला, बुलढाणा, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नांदेड यासह अन्य जागा मागितल्या होत्या. जेथे आमची ताकत जास्त आहे. त्याच जागा आम्ही मागितल्या होत्या. पण त्यांनी आम्हाला ते सोडून दुसऱ्या जागांचा पर्याय दिला होता. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीच्या आंदोलनाला बळ दिल आहे. प्रा.हाके यांच्या उपोषणस्थळी ऍड. बाळासाहेब आंबेडकर सर्वप्रथम गेले होते. ओबीसींना आम्ही नेहमीच सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे असे मत बनसोडे यांनी व्यक्त केले.

Share this article:
Previous Post: भाजपाच्या पराभवातून अनेक त्रुटींचा अनुभव आला, पुढील निवडणुकीत त्यात सुधारणा करु-राधाकृष्ण विखे पाटील

June 23, 2024 - In Uncategorized

Next Post: प्रसार माध्यमांना दोष देणारा मुख्याध्यापक जलील खा पठाण पोलिसांनी जेरबंद केला आणखीन तिघांचा शोध सुरू

June 24, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.