वंचितकडून नांदेड उत्तर विधानसभेसाठी ऍड.यशोनिल मोगले इच्छूक


नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहेत. वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यातच नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातून ऍड.यशोनिल मोगले यांनी पक्ष निरिक्षकांकडे उमेदवारीसाठी आपण इच्छूक असल्याचे त्यांनी कळविले आहे.
भारिप बहुजन महासंघापासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंत एकनिष्ठेने काम करणाऱ्या व नांदेड अभिवक्ता महासंघाचे सदस्य, उच्च शिक्षीत तरुण ऍड.यशोनिल मोगले यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाची वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. विशेषत: 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर त्यांचे वडील उत्तमराव मोगले यांनी विधानसभा निवडणुक लढविली होती. राजकारणातील अनुभवी आणि उच्च शिक्षीत असणारा तरुण उमदा उमेदवार म्हणून ऍड.यशोनिल मोगले यांची मतदारांना एक नंबरची पसंती राहु शकते. मतदार संघाचा अभ्यास असल्यामुळे त्यांना आगामी काळात वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली तर ती फायद्याची ठरू शकते असेही बोलल्या जात आहे.


Post Views: 1,333


Share this article:
Previous Post: भाजपाला काँग्रेसचे माणस मारायचे आहेत जगवायचे नाहीत-सुर्यकांताताई पाटील

June 26, 2024 - In Uncategorized

Next Post: स्वस्त धान्य दुकानदारांचे धरणे आंदोलन – VastavNEWSLive.com

June 27, 2024 - In Uncategorized

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.