लोहा तालुक्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

Read Time:3 Minute, 41 Second

लोहा : गेल्या दोन दिवसापासून लोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे त्यामुळे तालुक्यातील बोरगाव ,पांगरी ,सोनमांजरी आडगाव, पेनुर , अंतेश्वर, सायाळ, भारसवाडा या सह ईतर गावातील शेतामध्ये पुराचे पाणी घुसले आहे आणि पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पण अजूनही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यासाठी अधिकार आले नसल्याचे गावकरी,यांनी सांगितले.

तालुक्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती पण गेल्या दोन दिवसापासून पावसाने तालुक्यात कहर केला असून अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहे पांगरी बोरगाव आडगाव या बागांमध्ये गावालगतच्या नदीला पूर येऊन या पुराचे पाणी मोरगाव आडगाव शिवारात घुसले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बोरगाव येथील अंदाजे शंभर हेक्टर शेती मधले उडीद सोयाबीन तूर कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात गुडघाभर पाणी असल्याचे गावातील शेतकरी अजित पाटील यांनी सांगितले नुकसानग्रस्त शेतक-्यांमध्ये पुंडलिक हारजी पाटील, अर्जुन पाटील, विठ्ठल पाटील उद्धव पाटील, माधव चिमटे, मन्मथ आंबेगावे, संजय क्षिरसागर ,शिवा पाटील ,हरी आंबेकर यांच्या शेतामध्ये पुराचे पाणी गेल्याने उडीद सोयाबीन तूर कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेले दोन दिवसा पासून त्यांच्या शेतामध्ये गुडघा भर पाणी आहे अजूनही तेथे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे पंचनामे करण्यासाठी गेलेले नाहीत.

आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी या अतिवृष्टीत आलेले पिक वाहून गेल्याने हवालदिल झालेला आहे त्याच्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवण्याची वेळ आलेली आहे ७२ तासांमध्ये नुकसानग्रस्त शेतक-्यांनी ऑनलाइन पीक विम्यासाठी अर्ज करावा असे शासन म्हणते आहे परंतु ७२ तास उलटून गेले तरी अनेक शेतक-्यांच्या ड्राय मोबाईलची व्यवस्था नाही त्यामुळे अजूनही शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने ७२ तासांची आठ शेतीतील करून ऑफलाइन त्यांचे अर्ज घ्यावेत आणि त्यांना नुकसानग्रस्त आचे अनुदान द्यावे अशी मागणी अनेक गावातील शेतक-यांनी केली आहे याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीयार्ने लक्ष देऊन पिक विमा कंपन्यांना बँकांना सूचना कराव्यात अशी ही मागणी जोर धरू लागते आहे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =