लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या निमित्ताने… -डॉ.दिगंबर रामराव मोरे

Read Time:6 Minute, 3 Second

रविवारी सोळावे राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन नांदेड जिल्ह्यातील व्यंकटराव पाटील कवळे साहित्यनगरी, वाघलवाडा येथे होत आहे. आपणा श्रोत्यां-वक्त्यांसाठी, लेखक-कविसांठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. दरवर्षी एका दिवशी महाराष्ट्रातील नामवंत लेखक कवींना आपल्या जन्मगावी बोलवून त्यांचा आपल्या भूमीतील माणसांशी संवाद घडवून आणण्याचे कार्य यशवंतराव ग्रामविकास व शिक्षणप्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा दिगंबर कदम करतात.

दिगंबर कदम यांचा जन्म कष्टकरी-शेतकरी कुटुंबातला. जिद्दीने शिक्षण घेऊन त्यांनी अध्यापनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. एक उदात्त ध्येय समोर ठेवून त्यांनी करकाळासारख्या खेड्यात इ.स. २००२ पासून राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्यसंमेलनाची सुरुवात केली. ते आजपर्यंत निष्ठेने, सातत्याने साहित्य संमेलनाचे आयोजन करताना दिसतात.

आपल्या मुलांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक साहित्यिक वातावरण मिळाले पाहिजे. ही मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात झळकली पाहिजेत असे त्यांना नेहमी वाटते. त्यांनी आपल्या शाळेत मुलांच्या सुप्त गुणांना फुलविणारे अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक बनले. आज सेवानिवृत्तीनंतरही त्यांचा मुलांशी सदोदित संवाद सुरु असतो.

कष्टकऱ्यांचा मुलगा, एक हाडाचा शिक्षक, कुशल संघटक, सर्जनशील लेखक, परखड वक्ता, बहुश्रूत सूत्रसंचालक, उत्तम नकलाकार, प्रेमळ व मनमिळावू मित्र, जबाबदार पालक, कल्पक संपादक आणि मुख्य म्हणजे लोकसंवाद साहित्य संमेलनाचा यशस्वी संयोजक अशा अनेक भूमिका त्यांनी नेटकेपणाने व जवाबदारीने निभावल्या. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी मुलांसाठी, वेगवेगळे उपक्रम राबविल्यामुळेच राज्यशासनाने त्यांना आदर्श

शिक्षक म्हणून गौरवला सर्जनशील लेखक म्हणून मुलांची वाचनक्षमता विण्यासाठी बाबा आमटे यांचे चरित्र लिहिले. तसेच माणुसवेडा महाकवी : कुसुमाग्रज व आधुनिक भगीरथ : शंकरराव चव्हाण या चरित्रग्रंथाचे लेखन केले. यशोगान हे पथनाट्य व गरजा आणि उर्जा ही एकांकिकाही त्यांच्या नावावर आहे. ओळख महाराष्ट्रभर आहे. पांगुळ या कथेच्या बहारदार सादरीकरणाने अखिल हे. मुख्य म्हणजे कथाकार म्हणून त्यांची भारतीय मराठी साहित्य संमेलनासह अनेक संमेलने त्यांनी गाजविली. त्यांची | ही कथा त्यांच्या पहाडी आवाजात सादर होताना श्रोते मंत्रमुग्ध होतात. रात्रीपर्यंत चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होते. या दिंडीतील शालेय मुलांनी केलेले देखावे लक्षवेधी असतात. या संमेलनात ग्रंथप्रदर्शन, वेगवेगळ्या विषयावरील वैचारिक परिसंवाद, कथाकथन,

आणि कविसंमेलन असे बहारदार कार्यक्रम असतात. महाराष्ट्रातील जुन्यानव्या साहित्यिकांना आपल्या   व्यक्तीसाठी हे हक्काचे व्यासपीठ असते.  याच संमेलनाच्या उद्घाटकीय सोहळ्यात शैक्षणिक, सामाजिक, माध्यमे, साहित्य, आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नामवंतांचा मान्यवरांच्या । हस्ते गौरव करून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य संयोजकाच्या कल्पक दृष्टीतून केले जाते.लोकसंवाद संमेलनाच्या माध्यमातून  महाराष्ट्रातील अनेक सर्जनशील साहित्यिकांना जोडण्याचे काम संयोजक करतात. या संमेलनाची व्याप्ती ही आता केवळ एका गावापुरती न राहता तिला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना, नवे साहित्यिक, नवे अध्यक्ष, उद्घाटक मुख्य म्हणजे या संमेलनाच्या स्मरणिकेतून येणारे समकालीन महत्त्वाचे लेखन दखलपात्र असेच असते.

रविवारी होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे करणार असून संमेलनाचे अप्यक्षस्थान ख्यातनाम विचारवंत, लेखक डॉ.  प्रल्हाद लुलेकर हे भूषविणार आहेत. या संमेलनास मेनःस्वी शुभेच्छा!

 

-डॉ.दिगंबर रामराव मोरे

Leave a Reply

Your email address will not be published.

eleven + 15 =